नागपूर : शहरातील जलवाहिनी, सांडपाण्याची पाइपलाइन लिकेज हाेणे, खराब हाेणे, फुटणे ही नित्याचीच बाब आहे. मग ही पाइपलाइन कुठे खराब किंवा लिकेज आहे, हे शाेधणे माेठी डाेकेदुखी ठरते. इथे खाेद, तिथे खाेदा करीत परिसरात खाेदकाम हाेते. मात्र ही डाेकेदुखी चुटकीसरशी सुटू शकते. एक छाेटे ॲप खाेदकाम न करता बसल्या जागी प्रशासनाला जलवाहिनीची समस्या नेमकी काेणत्या जागी आहे, हे अचूक सांगू शकेल.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था ( नीरी)ने ‘रिस्क पिनेट २.०’ हे ॲप विकसित केले आहे. क्लिनिंग टेक्नाॅलाॅजी ॲण्ड माॅडेलिंग डिव्हिजनच्या वैज्ञानिक डाॅ. आभा सारगावकर आणि प्रधान वैज्ञानिक आशिष शर्मा यांनी हे ॲप विकसित केले. डाॅ. आभा यांनी गणितीय माॅडेल तयार केले तर शर्मा यांनी त्यानुसार साॅफ्टवेअर विकसित केले आहे. नागपूर महापालिकेसह नाशिक, चेन्नई, हैदराबाद, वर्धा येथे प्रशासनाने या ॲपवर यशस्वी प्रयाेग केला आहे. हे जीआयएसवर आधारित साॅफ्टवेअर असून, भारतीय परिस्थितीचा विचार करून बनविलेले देशतील एकमेव ॲप असल्याचा दावा आशिष शर्मा यांनी केला. हे पूर्णपणे तयार असून, व्यावसायिक उपयाेगासाठी रेडी असल्याचे त्यांनी सांगितले. ........